छायाचित्रणाचं आणि आमचं नातं तसं बऱ्यापैकी जुनं - म्हणजे अगदी डोक्यावर काळं कापड अोढुन चित्रविषयाचा अंत पाहीपर्यंत खुडबुड करुन शेवटी एकदा छायाचित्रकारासकट सगळ्यांना कंटाळा आल्यावर निघतो तो फोटो - इतकं जुनं नाही, किंवा 'जे वेड मजला लागले, तुजलाही ते लागेल का?' असं म्हणून प्रेयसीच्या चित्राजवळच प्रेमाची कबुली देण्याची हिंमत असण्याच्या काळाइतकंही जुनं नाही. कॅमेऱ्याशी पहिली अोळख झाली ती Agfa Click III ने. पुढे हॉटशॉट, पेंटॅक्सचा SLR अशी वळणं घेत नायकॉन SLR हा पहिल्यांदा मनापासून प्रयोग करून पाहिलेला कॅमेरा. तेव्हा कॅमेरा म्हणजे 'डिजिटलच' असे समीकरण डोक्यात पक्के बसलेल्या पीढीपेक्षा जुने. अर्थात तेव्हा फिल्म वापरत असल्याने आणि हौशे-नवशे कलाकार असल्याने प्रयोग जरा जपुनच करायला लागायचे. पण हळुहळु लेन्स जमवत राहिल्यावर डिजिटल SLR आल्यावरही नायकॉनशीच प्रामाणिक राहिलो. शिवाय आमचे बहुतेक चित्रांचे प्रीतिविषय युगानुयुगं आहेत तिथेच थांबलेत (Landscapes) त्यामुळे प्रतारणेचं काही कारणच नव्हतं.
नमनाला खरं तर याहून जास्त तेल घालायला हवं होतं कारण प्रत्यक्ष फोटो पाहिल्यावर जो रसभंग होईल त्याची उणीव आधी भाराभर लिहून भरुन काढायला हवी; पण जितकं लिहिन तितक्या अपेक्षाही वाढतील, त्यामुळे मला वाटतं इतकी प्रस्तावना पुरे; शिवाय जास्त तेल प्रकृतीला चांगलं नाही असं नवं फॅड आहे तेही लक्षात ठेवलेलं बरं...
काही(च्या काही) फोटो...