आजपर्यंत गाण्यांवर जे लेख लिहिले ते सहज चाळताना लक्षात आलं की सगळे हिंदी चित्रपट संगीतावर लिहिले. असं कसं झालं? मराठी गाण्यांवरचं प्रेम खरं तर हिंदी गाण्यांपेक्षा जुनं! गदिमा,
शांताबाई शेळके, पाडगांवकर, जगदीश खेबुडकर, पी. सांवळाराम या आणि अशा अनेक कवींच्या रचनांमधूनच लहानपण, तारुण्य, आता मध्यमवय सगळं उमजायला मदत झाली. आयुष्यातले सगळे बरे-वाईट अनुभव माझ्या वाट्याला येण्यापुर्वीच त्यांना या गीतकारांनी कागदावर मांडले. या एकेका गीतकारावर एक लेख लिहून पुरणार नाही इतकं अफाट आणि दर्जेदार काम त्यांनी करुन ठेवलं आहे. पण तरी मराठी गाण्यांवर काहीच लिहू नये मी?
माझ्या पीढीच्या लहान मुलांची भाषेशी अोळख झाली तशीच माझीही 'इथे इथे बस रे मोरा' ने झाली, पुढे बालवाडीत (तेव्हा प्ले ग्रुप, के.जी. मॉंटेसरी वगैरेचं फॅड नव्हतं) 'मनीमाऊचं बाळ किती गोरं गोरं पान' किंवा 'आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो', मग पुढे घरातल्या रेडिअोवर वाजणारी 'नाच रे मोरा आंब्याच्या वनात' आणि 'झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी' ही आणि अशी गाणी यावर माझं लहानपण पोसलं. त्यातूनच पुढे कवितांची आवड निर्माण झाली, इतकी की शाळेचं वर्षं सुरु व्हायच्या आधी पुस्तकं आणली की मराठीच्या पुस्तकाला कव्हर घालेपर्यंतही धीर नसायचा! आधी त्यातल्या कविता वाचून काढायच्या! अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊनही किंवा नंतर कितीतरी वर्षं संगणक क्षेत्रात काम करुनही ते प्रेम, आकर्षण आजतागायत कमी झालेलं नाही.