एकेका आवाजात उपजतच दर्द असतो... त्या आवाजात इतरही अनेक प्रकारची गाणी आपल्याला आवडतात. त्यात त्याच आवाजातली प्रेमगीतं असतात, द्वंद्वगीतं असतात - ती ही छान प्रेमाची, उडत्या चालीची असतात, तशीच विरहाचीही असतात, भजनं असतात, गज़ल असतात, देशभक्तीपर गीतंही असतात. कधी चक्क शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणंही ऐकायला मिळतं तर बऱ्याच वेळा जीवन-मरणाच्या खेळावर, तत्त्वज्ञानाने भरलेलीही गाणी असतात. थोडक्यात काय, तर कोणत्याही हरहुन्नरी पार्श्वगायकाकडून चोखंदळ श्रोत्याची ज्या अपेक्षा असतात, त्या सगळ्या तो आवाज अगदी समर्थपणे पार पाडतो, ते ही कित्येक दशकं - अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! पण तरी या सगळ्यांत मनाला स्पर्शून जातो तो त्या आवाजातला उपजत दर्द... मुकेशची गायकी मला सगळ्यांत जास्त भावते ती त्याच्या या दर्दभऱ्या गाण्यांसाठी. तशी मुकेशच्या आवाजात वर म्हटलेली सगळ्या प्रकारची गाणी आहेत, अगदी माझ्या आवडीचीही! पण तरी माझ्या मनाला भिडतो तो त्या आवाजातला दर्दच.
तसं पाहिलं तर दिल्लीला एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला मुकेश चंद्र माथुर चित्रपटांच्या मायावी दुनियेत येण्याचं काही खास कारण नव्हतं. पण बहिणीला गाणे शिकवायला गुरुजी घरी यायचे तेव्हा शेजारच्या खोलीत बसून या महाशयांची संगीतसाधना सुरु असायची. साहजिकच, एकदा सुरांचं वेड लागल्यावर रूढ शिक्षणात कुठली गोडी वाटणार! त्यामुळे दहावीनंतर शिक्षण सुटलं आणि PWD मध्ये नोकरी करत असताना एकीकडे गाण्याचा आणि चित्रपटात काम करण्याचा ध्यास जोपासायला सुरुवात केली. प्रख्यात चित्रपट-कलाकार मोतीलाल हे मुकेशचे दूरचे नातेवाईक. मुकेशचा आवाज ऐकल्यावर आग्रहाने आपल्या घरी मुंबईला घेऊन आले आणि पं. जगन्नाथ प्रसादांकडे रीतसर गाण्याच्या शिक्षणाची सोय केली. सुदैवाने लवकरच 'निर्दोष' या चित्रपटात नलिनी जयवंतबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. चित्रपटात काम करण्यासारखं व्यक्तिमत्त्व तर होतंच. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काही चित्रपटात भूमिका केल्याही. पण मुकेशचं लहानपणापासूनचं दैवत म्हणजे सुप्रसिद्ध गायक-नट कुंदन लाल सैगल. त्यामुळे मुकेशच्या सुरुवातीच्या गायकीवर सैगलची छाप अगदी जाणवण्यासारखी होती - इतकी की 'पहली नज़र' चित्रपटात संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडे मुकेशनी एक गाणं गायलं, जे अतिशय लोकप्रिय झालं - 'दिल जलता है तो जलने दो' आणि असं म्हणतात की सैगलनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की हे गाणं आपण कधी म्हटलं ते आठवत कसं नाही! हळूहळू पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धी तर वाढतच होती शिवाय कामही खूप येऊ लागलं तशी दुर्दैवाने गायन आणि अभिनय यांत निवड करण्याची वेळ आली. सुदैवाने मुकेशनी गायनाची निवड केली, नाहीतर कितीतरी अजोड गाण्यांना आपण मुकलो असतो! एकदा पूर्णपणे पार्श्वगायन करायचं ठरवल्यावर मात्र नौशादच्या मदतीने मुकेशनी स्वतःची अशी गायकी निर्माण केली.
मुकेशनी कुणासाठी पार्श्वगायन केलं नाही? दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शशी कपूर, मनोज कुमार, संजीव कुमार... किती म्हणून नावं घ्यावीत! पण मुकेशचा आवाज सगळ्यांत जास्त भावला राज कपूरसाठी पार्श्वगायन करताना - इतका, की मुकेशच्या अकाली निधनानंतर राज कपूरने श्रद्धांजली वाहताना सांगितले की मी आज आवाज गमावला! बरं ही सगळी कारकीर्द करताना तलत, रफी, किशोर कुमार, मन्ना डे, हेमंत कुमार - हे बिनीचे कलाकार बरोबरीने चित्रपटसृष्टी गाजवत होतेच! पण तरी मुकेशचा आवाज इतका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा होता की अनिल विश्वास, नौशाद, सी. रामचंद्र, मदन मोहन, रोशन, हेमंत कुमार, शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अो. पी. नय्यर, सलिल चौधरी, जयदेव, कल्याणजी-आनंदजी, खय्याम, चित्रगुप्त, लक्ष्मीकांत-प्यारेलाल - थोडक्यात त्या कालावधीतल्या सगळ्या नावाजलेल्या संगीतकारांना या आवाजाची भुरळ पडली. अर्थात यात आश्चर्य ते काय? स्वच्छ उच्चार, शुद्ध वाणी, गाण्यातल्या भावाशी एकरुप होण्याची नैसर्गिक देणगी, जोडीला भरपूर रियाज आणि कष्ट - हे सगळं असल्यावर पाणीदार मोत्यासारखी गाणी त्या गळ्यातून बाहेर पडत राहिली आणि रसिकांना रिझवत राहिली; इतकी की जिवंतपणी मरण भोगायला लावणाऱ्या चित्रपटाच्या या मायावी दुनियेला या आवाजाचा मोह मृत्यूनंतरही सुटला नाही! चार वेळा फिल्म फेअर पुरस्कार आणि 'रजनीगंधा' चित्रपटातील 'कई बार युँ भी देखा है' या गाण्यासाठी पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेच पण त्याहूनही जास्त मोलाची गोष्ट मुकेशनी मिळवली ती म्हणजे चाहत्यांचं अजोड प्रेम!
खरं तर माझा स्वभाव काही फार गंभीर वगैरे नाही. 'चुपके चुपके' पासून 'टॉम अँड जेरी' पर्यंत सगळ्या प्रकारचे आणि वयोगटासाठीचे विनोदपट पाहताना मी डोळ्यांतून पाणी येऊन पोट दुखायला लागेपर्यंत हसू शकते. 'अवघाचि संसार' मधली निरागसता मोहवते. 'आनंद मठ' किंवा अगदी 'बॉर्डर' पाहतानाही विदेशी शत्रूला हरवायच्या जिद्दीने माझ्या मुठी आवळल्या जातात. 'वोह कौन थी', 'बीस साल बाद' किंवा 'कोहरा' कितीही वेळा पाहिला तरी त्यातला थरार आजही जाणवतो. 'गॉन विथ दि विंड', 'कॅसाब्लांका' किंवा 'दि लास्ट सामुराई' पाहताना त्या पात्रांबरोबर मी ही तो प्रवास करते आणि नकळत अंतर्मुखही होते. 'आनंद', 'खामोशी' सारखे चित्रपट वेगळ्या अर्थाने डोळ्यांतून पाणी काढतात, पण तरी ते परत-परत पहावेसे वाटतात. पण तरी गाणी ऐकताना नकळत दर्दभऱ्या, मन व्याकुळ करणाऱ्या गाण्यांची प्ले-लिस्ट आपोआप लावली जाते. क्वचित कधी विचार करण्याचा प्रयत्न केला, की अशी दर्दभरी गाणी आपल्याला का आवडतात जास्त? आधी म्हटले तसे माझा स्वभाव गंभीर तर नाहीच, पण माझं आयुष्यही चार-चौघांसारखंच आहे की! सगळ्यांच्याच आयुष्यात येतात तसे दुःखाचे क्षण माझ्याही आयुष्यात आलेच, पण गोळाबेरीज केली तर सुखाचे क्षण कणभर जास्तच भरतील... मग असं असेल का? ही अशी गाणी या मुळात चांगल्या कविता असतात; मग त्याला तशीच चपखल चाल आणि असा अंतर्बाह्य हलवून टाकण्याची ताकद असलेला आवाज लाभला तर आपसूकच ती गाणी मनाला नुसती स्पर्शून जात नाहीत, तर आपली हक्काची जागा मनात निर्माण करतात! अशी ही काही माझ्या मनात स्वतःची हक्काची जागा घेऊन राहिलेली मुकेशची गाणी.
कहीं दूर जब दिन ढ़ल जाये (आनंद) - पूर्ण गाणं म्हणजे एक तरल भावशिल्प आहे... कविता, कविता म्हणतात ती हीच! १९७१ सालचा हा चित्रपट म्हणजे हसू आणि आसू यांचं अजब मिश्रण आहे! चित्रपट सुरु झाल्यावर काही मिनीटांतच आपल्याला कळतं की चित्रपटाचा नायक आनंद याचा मृत्यू झालेला आहे. चित्रपट सुरु होतो फ्लॅशबॅकने. कॅन्सरमुळे मोजके आयुष्य राहिलेला आनंद शेवटचे दिवस मुंबईत काढावेत आणि आपला जीवलग मित्र डॉ. कुलकर्णी (रमेश देव) याला भेटावे या हेतूने मुंबईला येतो. पण हे हाती राहिलेले मोजके क्षण आनंदला 'जगायचे' असतात. त्यामुळे त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याकडून मिळते प्रेम आणि हसू याची देणगी. इतकी, की अतिशय गंभीर वृत्तीचा आणि आजार टोकाला गेलेल्या प्रत्येक पेशंटचं दुःख जणू आपल्या खांद्यावर वहात असावा असा डॉक्टर भास्कर बॅनर्जीही हळूहळू सैलावत जातो, आनंदमध्ये गुंततो. दिग्दर्शक हृषिकेष मुखर्जींचा हा चित्रपट 'आवर्जून पहायलाच हवा' अश्या कोणत्याही यादीत अगदी सहज स्थान मिळवतो. 'बाबू मोशाय' ही हाक या चित्रपटाचा जणू ट्रेड-मार्क बनली.
संगीतकार सलिल चौधरी आणि गीतकार योगेश या दोघांच्याही कारकिर्दीला 'आनंद'ने जणू संजीवनी दिली. कोणाही सोबत असताना सतत हसणारा आणि हसवणारा आनंद एकटा असताना मात्र अंतर्मुख होतो, आपलं दुःख जणू तो फक्त स्वतःबरोबरच वाटून घेतो. हे सगळं अतिशय नेमकेपणाने या गाण्यात येतं. ते ही इतकं हळुवारपणे की जणू आपल्या मनाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही ही आपली घालमेल, मनाचं कोलमडणं दिसू तर नयेच, पण जाणवूही नाही.
संगीतकार रोशननी अतिशय सुरेल पण तरीही थोडी गंभीर अशी चाल गीताला दिली आहे. मुकेशनीही नेहमीपेक्षा थोड्या वरच्या पट्टीतलं हे गाणं इतकं सुरेख म्हटलं आहे की वरचे सुर असुनही, वाव असुनही गाणे कर्कश किंवा चिडखोरपणाचे न वाटता, नायकाच्या मनातलं विश्वासघाताचं दुःख, प्रेयसी गमावल्याचं दुःख, आणि या सगळ्यामुळे होणारी मनाची घुसमट टोकदारपणे आपल्यापर्यंत पोहोचते.
मुकेशबद्दल बोलताना पुष्कळ वेळा त्याच्या आवाजातील त्रुटींचा उल्लेख केला जातो. आवाज बरेच वेळा एकसुरी वाटतो, शास्त्रीय धर्तीची गाणी पेलत नाहीत... मला यातलं फारसं काही कधी जाणवत नाही. तसे असेलही; पण माझ्या मते हे त्याच्या आवाजाचे विश्लेषण झाले. आणि मी गाणी मनाने ऐकते, डोक्याने नाही. त्यामुळे जी गाणी माझ्या मनाला भिडतात ती मला आवडतात. कुठे तरी त्या गाण्यांशी माझिया मनीचे नाते जुळते. ती गाणी आठवली की दिवसभर माझी पाठ धरतात, भुताने झाड धरावं तशी - आणि मला ते खूप आवडतं... म्हणूनच मला मुकेशच्या आवाजातल्या या त्रुटींचा त्रास होत नाही. माझ्यासाठी जमेच्या पारड्यात बरंच काही आहे. ज्याच्या आवाजातला दर्द मला भिडतो, ज्याच्या आवाजातला धीरगंभीर पण संयमित शोक मला हलवून सोडतो, त्याला समजा शास्त्रीय धर्तीची गाणी देणं संगीतकारांना आवडत नसेल तर नसो! माझं काहीच अडत नाही त्यामुळे. माझ्यासाठी 'अपना ही होके सहे दर्द पराये' हेच पुरेसं दुःखदायक सत्य आहे.
तसं पाहिलं तर दिल्लीला एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला मुकेश चंद्र माथुर चित्रपटांच्या मायावी दुनियेत येण्याचं काही खास कारण नव्हतं. पण बहिणीला गाणे शिकवायला गुरुजी घरी यायचे तेव्हा शेजारच्या खोलीत बसून या महाशयांची संगीतसाधना सुरु असायची. साहजिकच, एकदा सुरांचं वेड लागल्यावर रूढ शिक्षणात कुठली गोडी वाटणार! त्यामुळे दहावीनंतर शिक्षण सुटलं आणि PWD मध्ये नोकरी करत असताना एकीकडे गाण्याचा आणि चित्रपटात काम करण्याचा ध्यास जोपासायला सुरुवात केली. प्रख्यात चित्रपट-कलाकार मोतीलाल हे मुकेशचे दूरचे नातेवाईक. मुकेशचा आवाज ऐकल्यावर आग्रहाने आपल्या घरी मुंबईला घेऊन आले आणि पं. जगन्नाथ प्रसादांकडे रीतसर गाण्याच्या शिक्षणाची सोय केली. सुदैवाने लवकरच 'निर्दोष' या चित्रपटात नलिनी जयवंतबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. चित्रपटात काम करण्यासारखं व्यक्तिमत्त्व तर होतंच. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काही चित्रपटात भूमिका केल्याही. पण मुकेशचं लहानपणापासूनचं दैवत म्हणजे सुप्रसिद्ध गायक-नट कुंदन लाल सैगल. त्यामुळे मुकेशच्या सुरुवातीच्या गायकीवर सैगलची छाप अगदी जाणवण्यासारखी होती - इतकी की 'पहली नज़र' चित्रपटात संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडे मुकेशनी एक गाणं गायलं, जे अतिशय लोकप्रिय झालं - 'दिल जलता है तो जलने दो' आणि असं म्हणतात की सैगलनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की हे गाणं आपण कधी म्हटलं ते आठवत कसं नाही! हळूहळू पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धी तर वाढतच होती शिवाय कामही खूप येऊ लागलं तशी दुर्दैवाने गायन आणि अभिनय यांत निवड करण्याची वेळ आली. सुदैवाने मुकेशनी गायनाची निवड केली, नाहीतर कितीतरी अजोड गाण्यांना आपण मुकलो असतो! एकदा पूर्णपणे पार्श्वगायन करायचं ठरवल्यावर मात्र नौशादच्या मदतीने मुकेशनी स्वतःची अशी गायकी निर्माण केली.
मुकेशनी कुणासाठी पार्श्वगायन केलं नाही? दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शशी कपूर, मनोज कुमार, संजीव कुमार... किती म्हणून नावं घ्यावीत! पण मुकेशचा आवाज सगळ्यांत जास्त भावला राज कपूरसाठी पार्श्वगायन करताना - इतका, की मुकेशच्या अकाली निधनानंतर राज कपूरने श्रद्धांजली वाहताना सांगितले की मी आज आवाज गमावला! बरं ही सगळी कारकीर्द करताना तलत, रफी, किशोर कुमार, मन्ना डे, हेमंत कुमार - हे बिनीचे कलाकार बरोबरीने चित्रपटसृष्टी गाजवत होतेच! पण तरी मुकेशचा आवाज इतका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा होता की अनिल विश्वास, नौशाद, सी. रामचंद्र, मदन मोहन, रोशन, हेमंत कुमार, शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अो. पी. नय्यर, सलिल चौधरी, जयदेव, कल्याणजी-आनंदजी, खय्याम, चित्रगुप्त, लक्ष्मीकांत-प्यारेलाल - थोडक्यात त्या कालावधीतल्या सगळ्या नावाजलेल्या संगीतकारांना या आवाजाची भुरळ पडली. अर्थात यात आश्चर्य ते काय? स्वच्छ उच्चार, शुद्ध वाणी, गाण्यातल्या भावाशी एकरुप होण्याची नैसर्गिक देणगी, जोडीला भरपूर रियाज आणि कष्ट - हे सगळं असल्यावर पाणीदार मोत्यासारखी गाणी त्या गळ्यातून बाहेर पडत राहिली आणि रसिकांना रिझवत राहिली; इतकी की जिवंतपणी मरण भोगायला लावणाऱ्या चित्रपटाच्या या मायावी दुनियेला या आवाजाचा मोह मृत्यूनंतरही सुटला नाही! चार वेळा फिल्म फेअर पुरस्कार आणि 'रजनीगंधा' चित्रपटातील 'कई बार युँ भी देखा है' या गाण्यासाठी पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेच पण त्याहूनही जास्त मोलाची गोष्ट मुकेशनी मिळवली ती म्हणजे चाहत्यांचं अजोड प्रेम!
खरं तर माझा स्वभाव काही फार गंभीर वगैरे नाही. 'चुपके चुपके' पासून 'टॉम अँड जेरी' पर्यंत सगळ्या प्रकारचे आणि वयोगटासाठीचे विनोदपट पाहताना मी डोळ्यांतून पाणी येऊन पोट दुखायला लागेपर्यंत हसू शकते. 'अवघाचि संसार' मधली निरागसता मोहवते. 'आनंद मठ' किंवा अगदी 'बॉर्डर' पाहतानाही विदेशी शत्रूला हरवायच्या जिद्दीने माझ्या मुठी आवळल्या जातात. 'वोह कौन थी', 'बीस साल बाद' किंवा 'कोहरा' कितीही वेळा पाहिला तरी त्यातला थरार आजही जाणवतो. 'गॉन विथ दि विंड', 'कॅसाब्लांका' किंवा 'दि लास्ट सामुराई' पाहताना त्या पात्रांबरोबर मी ही तो प्रवास करते आणि नकळत अंतर्मुखही होते. 'आनंद', 'खामोशी' सारखे चित्रपट वेगळ्या अर्थाने डोळ्यांतून पाणी काढतात, पण तरी ते परत-परत पहावेसे वाटतात. पण तरी गाणी ऐकताना नकळत दर्दभऱ्या, मन व्याकुळ करणाऱ्या गाण्यांची प्ले-लिस्ट आपोआप लावली जाते. क्वचित कधी विचार करण्याचा प्रयत्न केला, की अशी दर्दभरी गाणी आपल्याला का आवडतात जास्त? आधी म्हटले तसे माझा स्वभाव गंभीर तर नाहीच, पण माझं आयुष्यही चार-चौघांसारखंच आहे की! सगळ्यांच्याच आयुष्यात येतात तसे दुःखाचे क्षण माझ्याही आयुष्यात आलेच, पण गोळाबेरीज केली तर सुखाचे क्षण कणभर जास्तच भरतील... मग असं असेल का? ही अशी गाणी या मुळात चांगल्या कविता असतात; मग त्याला तशीच चपखल चाल आणि असा अंतर्बाह्य हलवून टाकण्याची ताकद असलेला आवाज लाभला तर आपसूकच ती गाणी मनाला नुसती स्पर्शून जात नाहीत, तर आपली हक्काची जागा मनात निर्माण करतात! अशी ही काही माझ्या मनात स्वतःची हक्काची जागा घेऊन राहिलेली मुकेशची गाणी.
कहीं दूर जब दिन ढ़ल जाये (आनंद) - पूर्ण गाणं म्हणजे एक तरल भावशिल्प आहे... कविता, कविता म्हणतात ती हीच! १९७१ सालचा हा चित्रपट म्हणजे हसू आणि आसू यांचं अजब मिश्रण आहे! चित्रपट सुरु झाल्यावर काही मिनीटांतच आपल्याला कळतं की चित्रपटाचा नायक आनंद याचा मृत्यू झालेला आहे. चित्रपट सुरु होतो फ्लॅशबॅकने. कॅन्सरमुळे मोजके आयुष्य राहिलेला आनंद शेवटचे दिवस मुंबईत काढावेत आणि आपला जीवलग मित्र डॉ. कुलकर्णी (रमेश देव) याला भेटावे या हेतूने मुंबईला येतो. पण हे हाती राहिलेले मोजके क्षण आनंदला 'जगायचे' असतात. त्यामुळे त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याकडून मिळते प्रेम आणि हसू याची देणगी. इतकी, की अतिशय गंभीर वृत्तीचा आणि आजार टोकाला गेलेल्या प्रत्येक पेशंटचं दुःख जणू आपल्या खांद्यावर वहात असावा असा डॉक्टर भास्कर बॅनर्जीही हळूहळू सैलावत जातो, आनंदमध्ये गुंततो. दिग्दर्शक हृषिकेष मुखर्जींचा हा चित्रपट 'आवर्जून पहायलाच हवा' अश्या कोणत्याही यादीत अगदी सहज स्थान मिळवतो. 'बाबू मोशाय' ही हाक या चित्रपटाचा जणू ट्रेड-मार्क बनली.
संगीतकार सलिल चौधरी आणि गीतकार योगेश या दोघांच्याही कारकिर्दीला 'आनंद'ने जणू संजीवनी दिली. कोणाही सोबत असताना सतत हसणारा आणि हसवणारा आनंद एकटा असताना मात्र अंतर्मुख होतो, आपलं दुःख जणू तो फक्त स्वतःबरोबरच वाटून घेतो. हे सगळं अतिशय नेमकेपणाने या गाण्यात येतं. ते ही इतकं हळुवारपणे की जणू आपल्या मनाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही ही आपली घालमेल, मनाचं कोलमडणं दिसू तर नयेच, पण जाणवूही नाही.
कहीं तो ये दिल कहीं मिल नहीं पाते
कहीं निकल आये जनमों के नाते
है मीठी उलजझन, बैरी अपना मन
अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये
आणि अचानक जाणीव होते की जगाला आपण कितीही फसवलं, तरी आपल्या मनाला नाही फसवू शकत. ती भंगलेली स्वप्नं, ते दुःख आपल्या मनाच्या सोबतीला कायमच असणार आहेत कारण तेवढेच तर आपले स्वतःचे, आपले एकट्याचे आहेत...
दिल जाने, मेरे सारे, भेद ये गहरे
हो गये कैसे मेरे, सपने सुनहरे
ये मेरे सपने, यहीं तो है अपने
मुझ से जुदा ना होंगे इनके ये साये, इनके ये साये
कहीं दूर जब दिन ढ़ल जाये
सांझ की दुल्हन बदन चुराये, चुपके से आये
मेरे खयालों के आंगन में
कोई सपनों के दीप जलाये, दीपे जलाये
हे गाणं ऐकल्याशिवाय राहवत नाही आणि ऐकलं की दर वेळी एक अनामिक हुरहुर लागुन राहते. कधी सकाळी जाग येते तेव्हा हे गाणं डोक्यात वाजायला आधीच लागलेलं असतं आणि मग पूर्ण दिवस ती हुरहुर पाठलाग करत राहते. गाण्यात म्हटलंय, अगदी तशी अवस्था होते - 'है मीठी उलझन, बैरी अपना मन । अपना ही होके सहे दर्द पराये'. मुकेशच्या आवाजातला उपजत दर्द गाण्याचे भाव असे काही टिपतो की तो आवाज आणि गाणं जणू एकच होतात. असं वाटतं की हे एवढं एक गाणं म्हणण्यासाठी जणू मुकेशचा जन्म झाला असावा!
बहारों ने मेरा चमन लुटकर (देवर) - लहानपणचं जग किती वेगळं असतं ना! निरागस मैत्री, छोट्याश्या कारणावरुन होणारी भांडणं, 'मी तुझ्याशी कध्धी कध्धी बोलणार नाही जा!!!' असं म्हणून रागवून घरी पोहोचायच्या आत कधी एकदा भेटून एकदम आठवलेली आणि सांगायची राहिलेली गंमत सांगतो असं होणं... पण खरं तर प्रेमिकांचं जगही अगदी असंच असतं ना? त्यातून लहानपणच्या जीवलग मैत्रीचं रुपांतर मोठं झाल्यावर आपल्या स्वप्नातल्या राजकुमारीत झालं तर! नशीबही असं की नेमका तिचाच रिश्ता येतो, पण घराण्याची रीत अशी की लग्नाआधी मुलाने मुलीला पहायचे नाही. मग यावर उपाय? तो तर घरातच असतो! त्यामुळे नायकासाठी सांगून आलेली मुलगी पहायला त्याचा मामेभाऊ जातो आणि नायक आपल्या या भावासाठी सांगून आलेली मुलगी पहायला. फरक इतकाच, की नायकाच्या डोक्यात हे पक्कं असतं की आपण जी मुलगी पाहतोय ती भावासाठी, पण भावाला मात्र होणारी भावजय पाहून तिच्या सौंदर्याचा आणि गुणांचा मोह होतो; ही मुलगी आपली भावजय न होता आपलीच पत्नी व्हावी यासाठी तो दोन्ही घरी रिश्ता ठरत असलेल्या मुलाचे अवगुण वर्णन करणारे पत्र पाठवतो. आणि त्याला हवी असलेली मुलगी त्याची पत्नी होते. दुर्दैवाने नायकाचे लग्न मात्र शिकलेल्या पण श्रीमंतीमुळे गर्वीष्ठ मुलीशी होते आणि जेव्हा तिला कळतं की आपला नवरा इंग्रजी अजिबात शिकलेला नाही, तेव्हा ती हे लग्न नाकारुन माहेरी परत निघुन जाते. इकडे नायकाला आपली भावजय हीच आपली बालपणीची मैत्रीण आणि नंतर जिचं स्वप्न पाहिलं आणि जिच्याशी आपलं लग्नही होतणार होतं तीच असल्याचं कळतं. शिवाय मामेभावाने लिहीलेली ती दोन्ही पत्रेही मिळतात. त्यामुळे चिडुन तो त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये जातो आणि तिथे या गाण्याच्या रुपात आपली कैफियत मांडतो.
बहारों ने मेरा चमन लुटकर खिजा को ये इल्जाम क्यों दे दिया
किसी ने चलो दुष्मनी की मगर, इसे दोस्ती नाम क्यों दे दिया
गाण्याचे दुसरे कडवे फार सुरेख आहे. चित्रपटाची कथा लक्षात घेऊन गीतकार आनंद बक्षींनी या गीताचे लेखन केले होते हे अगदी ठसठशीतपणे आपल्यासमोर येते.
मुझे क्या पता कभी इश्क में रक़ीबों को क़ासिद बनाते नहीं
खता हो गयी मुझ से क़ासिद मेरे तेरे हाथ पैग़ाम क्यों दे दिया
अतिशय अर्थपूर्ण कडवं आहे. रक़ीब म्हणजे प्रेमातला आपला प्रतिस्पर्धी आणि क़ासिद म्हणजे निरोप्या. थोडक्यात, नायक, आपल्या भावाला स्पष्टपणे जाणीव करुन देतो की जे काही केले ते आपल्याला कळलेले आहे. विश्वासाने ज्याला आपल्या वतीने स्वतःसाठी मुलगी पहायला पाठवली, त्यानेच कट-कारस्थान करुन आपला विश्वासघात केला आणि आपल्या प्रियतमेशी लग्न करुन मोकळा झाला.
संगीतकार रोशननी अतिशय सुरेल पण तरीही थोडी गंभीर अशी चाल गीताला दिली आहे. मुकेशनीही नेहमीपेक्षा थोड्या वरच्या पट्टीतलं हे गाणं इतकं सुरेख म्हटलं आहे की वरचे सुर असुनही, वाव असुनही गाणे कर्कश किंवा चिडखोरपणाचे न वाटता, नायकाच्या मनातलं विश्वासघाताचं दुःख, प्रेयसी गमावल्याचं दुःख, आणि या सगळ्यामुळे होणारी मनाची घुसमट टोकदारपणे आपल्यापर्यंत पोहोचते.
जो प्यार तुम ने मुझको दिया था (दुल्हा दुल्हन) - जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, ती निराधार असताना तिला आधार दिला, रहायला जागा दिली, लोक काही-बाही बोलु लागल्यावर तिच्याशी लग्न केलं, ती नेमकी दिवाळीच्या रात्री सोडून निघून जावी, तिला शोधुन काढलं, तर तिने अोळखणं तर दूरच, पण तिला आठवावं म्हणून ती आपली पत्नी असल्याचं तिला सांगितल्यावर तिने चक्क थप्पड मारावी! हे असं तुकडे-तुकडे झालेलं मन घेऊन कुठे जायचं? तिच्या आयुष्यातून दूर हे तर नक्की, कारण जिला शोधण्यासाठी आपलं घर-दार, काम-धंदा सोडला तिलाच जर आपली अोळख पटत नसेल तर तिच्या मूळच्या श्रीमंती आयुष्यात आपल्याला कशी जागा असेल? पण हा खेळ खेळायला नियतीला आपणच का मिळालो? का ती आपल्या आयुष्यात आली? का गेली?
हम को खबर भी होने नहीं दी
किस मोड़ पर लाके दिल तू ने तोड़ा
अपना बनाना रहा दूर, तू ने
अौरों के हो जाये, ऐसा न छोड़ा
तेरी जफ़ा का चर्चा ही कैसा
अपनी वफ़ा पे मैं शरमा रहा हूँ
१९६४ सालच्या 'दुल्हा दुल्हन' या चित्रपटाचे नायक-नायिका होते राज कपूर आणि साधना. नियतीचे फासे असे काही पडतात की जहागीरदार बापाची मुलगी असलेली साधना लग्नावरुन वडिलांशी वाद घालते. बाप-लेकीचे भांडण विकोपाला जाते आणि अचानक वडलांचा हात आपल्या लाडक्या लेकीवर उठतो. तेव्हा पडल्यामुळे आणि त्या धक्क्याने स्मृतीभ्रंश झाल्याने साधना घर सोडून जाते. सैरभैर होऊन वैतागून जीव द्यायला जाते तेव्हा राज कपूर तिला वाचवतो आणि आपल्याबरोबर मुंबईला घेऊन येतो, चाळीतल्या एका खोलीतल्या आपल्या घरात. तिच्या तो आणि ती त्याच्या केव्हा प्रेमात पडतात, दोघांनाही कळत नाही. लग्न होतं आणि अचानक दिवाळीच्या दिवशी तिची स्मृती परत येऊन ती वडलांकडे परत जाते. तो तिला भेटायला जातो पण दुर्दैवाने त्या मधल्या काळातले काहीच तिच्या लक्षात नसते. नाईलाजाने नायकाला नियतीचा ही क्रूर चेष्टाही स्विकारायला लागते. पण मनाचं काय? त्याची समजूत कशी आणि कोणी घालायची? तिच्यावर जे निस्सीम प्रेम केलं त्याचं काय करायचं? गीतकार इंदीवर आणि संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी हे सगळं अचूक पकडलं - जेमतेम दोनच कडवी, पण नायकाची पराभुत प्रेमाची कहाणी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. एकही शब्द - छे, एकही अक्षर, एकही सुर आवश्यकतेपेक्षा जास्त नाही की कमी नाही. आणि आवाज मुकेशचा असला तरी ते आपलं गाण्याची माहिती छापण्यासाठी. कारण राज कपूरचा गाण्याचा आवाज म्हणजेच मुकेशचा आवाज. इतकं तादात्म्य पावलेले कलाकार विरळाच.
मेरे टुटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे (छलिया) - १९६० सालचा 'छलिया' हा फाळणीवर आधारीत चित्रपट. नूतन, राज कपूर, प्राण, रहमान अशी तगडी स्टार कास्ट अक्षरशः वाया घालवणं केवळ मनमोहन देसाईंनाच जमू शकतं असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होऊ नये! खरं तर १९६० साली अजून फाळणीचं दुःख पूर्णपणे विसरलं गेलं नव्हतं. कथेचा गाभाही काही वाईट नाही. नूतन आणि रहमान लाहोरमध्ये रहात असतात, दोघेही चांगल्या सुस्थितीतल्या घरचे, शिकले-सवरलेले. एकमेकांना पसंत करुन, मोठ्या धुमधड्याक्यात लग्नही होतं. पण तेवढ्यात फाळणीचा भडका उडतो आणि दोघांची ताटातूट होते. आपलं शील वाचवत, गुंडापासून कसातरी आपला बचाव करत ती लपून छपून भारताच्या दिशेने यायचा प्रयत्न करत असते. अश्या वेळी तिला आसरा मिळतो एका अनपेक्षित ठिकाणी! अब्दुल अहमान नावाचा गुंड तिला वाचवतो, आपल्या घरी बहिण मानून आसराही देतो. तेव्हाच तिला ती गर्भवती असल्याचं कळतं तिला मुलगा होतो, पण तिला आणि तिच्या मुलाला वाचण्यासाठी तो मुलाला शिकवतो की कोणी नाव विचारले तर 'अब्दुल रहमान' म्हणून सांगायचे. थोडे शांत झाल्यावर तो तिला आणि मुलाला दिल्लीच्या गाडीत बसवून देतो. सुदैवाने दिल्लीत तिची आपल्या नवऱ्याशी भेटही होते. ती भेटल्यावर त्याला आनंद होतो, पण तो फार वेळ टिकत नाही, कारण ती जेव्हा त्यांच्या मुलाशी अोळख करुन देते आणि तो मोठ्या आनंदाने मुलाला हृदयाशी कवटाळून त्याचे नाव विचारतो, तेव्हा तो शिकवल्याप्रमाणे सांगतो 'अब्दुल रहमान'. झालं - एका क्षणात बायको भेटल्याचा आनंद तिच्यावरच्या संशयाने मिटून जातो आणि तो तिला नशीबाच्या हवाल्यावर सोडून मोकळा होतो. तिची अवस्था रामायणातल्या सीतेसारखी होते. ती मुलाला अनाथाश्रमात सोडून मिळेल ते काम करुन पोट भरु लागते. तिला रहायला जागा आणि आसरा देतो एक गुलहौशी स्वभावाचा पण गरज पडल्यास गुंडगिरी करणारा छलिया. ती आपल्याबद्दल काहीच सांगत नाही... कुठल्या तोंडानी सांगणार होती की नवऱ्याने भलता संशय घेऊन तिला आणि मुलाला वाऱ्यावर सोडले होते! तिच्या सालस आणि शांत स्वभावावर तो लुब्ध होतो आणि आपले प्रेम व्यक्त करुन तिच्याशी लग्न कराण्यानद्दल बोलू लागतो तेव्हा मात्र नाईलाज होऊन ती विवाहीत असल्याचे सांगते. क्षणार्धात प्रेमभंग झालेला गुलहौशी छलिया आपल्या तुटलेल्या हृदयाची व्यथा सांगतो -
मेरे टूटे हुए दिल से होई तो आज ये पूछे
के तेरा हाल क्या है, के तेरा हाल क्या है
कल्याणजी-आनंदजींच्या संगीतात एक वेगळीच जादू आहे. ऐकायला मधुर आणि सोप्या चाली, गाण्याची जात आणि पडद्यावरचे कलाकार पाहून त्याप्रमाणे चपखल अशी गायकाची योजना यामुळे गाणं अलगद आपल्या मनात कधी ठाण मांडतं ते आपल्यालाही कळत नाही. कमर जलालाबादींनी छलियाचं व्यक्तिमत्त्व आणि त्याची मनोवस्था हे दोन्ही ध्यानात घेऊन गीताचे शब्द लिहीले आहेत. हे पहिलंच कडवं पहा ना -
किस्मत तेरी रीत निराली
अो छलिये को छलनेवाली
फूल खिला तो टुटी ड़ाली
जिसे उल्फ़त समझ बैठा, मेरी नज़रों का धोखा था
किसी की क्या खता है, किसी की क्या खता है
पडद्यावर राज कपूरने गावं तर ते मुकेशच्याच आवाजात हे या अश्या गाण्यांमुळे जास्तच अधोरेखित होतं.
तेरी याद दिल से भूलाने चला हूँ (हरियाली अौर रास्ता) - 'देवर' चित्रपटाची आठवण यावी अशी नायक-नायिकेची बालपणीची मैत्री, फक्त इथे ती तारुण्यात दोघांच्याही मनात प्रीतीचा फुलबाग फुलवते. पण नायकाची सोयरीक लहानपणीच दुसऱ्याच - त्यांच्या घराण्याला शोभेल अश्या घराण्यातल्या मुलीशी ठरलेली. साहजिकच नायकाची इस्टेट सांभाळणारे मॅनेजर (जे, अर्थातच हिंदी चित्रपटाच्या नियमाप्रमाणे नायिकेचे वडिल असतात), ते मुलीला आपल्या प्रेमाची आहुती नायकाच्या सुखासाठी द्यायला सांगतात. हे सगळं असं परस्पर बाकीचे लोक ठरवत असलं की एक बरं असतं - गीतकार आणि संगीतकारांना छान-छान गाण्यांसाठी हव्या तितक्या सिच्युएशन्स मिळतात. म्हणजे, आधी शक्य झालं तर नायक-नायिका लहान असताना त्यांचीच सिग्नेचर ट्युन असावी तसं एक गाणं (जे बरेच वेळा दोघांना एकमेकांची मोठेपणी अोळख पटायला उपयोगी ठरतं), मग मोठे झाल्यावर शब्द बदलून तेच किंवा बजेटमध्ये बसत असेल तर नवीन एखादं प्रेमाचं युगलगीत, कुठे एखादं पार्टी किंवा पिकनिकचा प्रसंग निघाला तर त्यात एखादं गाणं, मग ज्याने त्याग केला असेल त्याच्या तोंडी एक आणि जोडगोळीपैकी दुसऱ्याच्या तोंडी एक - अशी विरहगीतं. साहजिकच प्रेक्षक म्हणून आपली अपेक्षा असते की निदान नायक-नायिकेने त्या-त्या गाण्याला शोभेसे भाव चेहऱ्यावर जमतील तसे आणावे. पण नायकाच्या भूमिकेत जर मनोज कुमार असेल तर मात्र त्याचाही नाईलाज होतो - विशेषतः विरह किंवा दुःखाची गाणी असतील तेव्हा. आपल्या सुदैवाने त्याने यावर एक छानशी युक्ती शोधली आहे. तो हातानी आपला चेहरा झाकून घेऊन प्रेक्षकांना गाणं मनसोक्त ऐकायची संधी न चुकता देतो. बरं, त्याला गाणी मिळतातही छान. उदाहरणार्थ १९६२ सालच्या 'हरियाली अौर रास्ता' मध्ये नायिका माला सिन्हाशी लग्न करणं शक्य नाही म्हटल्यावर मुकेश आपल्या मदतीला धावून येतो.
संगीतकार म्हणून शंकर-जयकिशन जोडीचं स्थान हिंदी चित्रपटसंगीताच्या दुनियेत वादातीत आहे. इतक्या अनंत प्रकारच्या रचना त्यांनी केल्या की आश्चर्याने बोट सहज तोंडात जावं... साथीला शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी या दोघांपैकी कोणी गीतकार असला तर एकेक गाणं म्हणजे पाणीदार मोतीच जणू! आता याच गाण्यात बघा ना, शैलेंद्रनी नायकाचे दुःखाने अोतप्रोत भरलेले हृदय जणू निसर्गाची साथ मागतं आहे आपले आसू लपवण्यासाठी अशी कल्पना केली आहे. किती चपखल कल्पना आहे! आणि तितकीच हृदयद्रावक... बहुतेक सगळ्या (पितृसत्ताक) पद्धतीत पुरुषाने आपलं दुःख व्यक्त करणं किंवा डोळ्यातून अश्रू काढणं हे त्याच्या कमजोरपणाचं लक्षण समजलं जातं. म्हणूनच बहुधा आपले अश्रू लपवण्यासाठी नायकाला निसर्गाची, पावसाची साथ हवी आहे.

तेरी याद दिल से भूलाने चला हूँ
के खुद अपनी हस्ती मिटाने चला हूँ
म्हणजे, इथे नायकाच्या दृष्टीने नायिकेचा कायमचा विरह म्हणजे स्वतःची अोळख विसरण्यासारखं आहे! पण तरी त्याला मदत हवी -
घटाअों तुम्हें साथ देना पड़ेगा
मैं फ़िर आज आंसू बहाने चला हूँ, बहाने चला हूँ
किती विलक्षण कल्पना आहे की आपल्या प्रेयसीला विसरणं म्हणजे आपली स्वतःची अोळख विसरण्यासारखं आहे! दोन जीव एक होणं म्हणजे तरी दुसरं काय?
सुदैवाने मुकेशच्या आवाजात या प्रकारची गाणी सादर करण्याची उपजत जादू आहे. त्यामुळे पडद्यावरचा मनोज कुमार सहज विसरला जातो आणि हे गाणं मुकेशचंच होऊन बसतं.
सुदैवाने मुकेशच्या आवाजात या प्रकारची गाणी सादर करण्याची उपजत जादू आहे. त्यामुळे पडद्यावरचा मनोज कुमार सहज विसरला जातो आणि हे गाणं मुकेशचंच होऊन बसतं.
हम ने अपना सब कुछ छोड़ा प्यार तेरा पाने को (सरस्वतीचंद्र) - १९६८ सालचा हा चित्रपट पडद्यावर झळकलेला अखेरचा कृष्ण-धवल चित्रपट. मूकपटापासून सुरुवात केलेला हिंदी चित्रपट असंख्य बरी-वाईट वळणं घेत विविध रंगांत स्थिरावला त्यालाही आता कित्येक दशकं होऊन गेली. अगदी 'सरस्वतीचंद्र' ज्या वर्षी प्रकाशित झाला त्या आधीच रंगीत चित्रपट रुळायला सुरुवात झाली होती. पण तरी दिग्ददर्शक गोविंद सरैयांनी 'सरस्वतीचंद्र' या गोवार्धनराम त्रिपाठींच्या गुजराथी महाकादंबरीवर जेव्हा चित्रपट पडद्यावर आणायचं ठरवलं तेव्हा त्यासाठी कृष्ण-धवल कॅनव्हास निवडला. नायिकेच्या भूमिकेत नूतनची निवड केल्यावर नायक कोण याने फारसा फरक पडत नाही कारण कोणताही चित्रपट, कोणतीही भूमिका आपल्या खांद्यावर पेलण्याचं सामर्थ्य तिच्या आभिनयात होतं. या चित्रपटाचं नाव हे खरं तर चित्रपटाच्या नायकाचं नाव! तेव्हा नायकाच्या भूमिकेत एखादा प्रस्थापित आणि खंदा अभिनेता असणं स्वाभाविक झालं असतं. कोणत्याही अभिनेत्याला आव्हान वाटावे इतके सामर्थ्य या भूमिकेत नक्कीच आहे. पण तरी सरैयांनी निवड केली नवोदित अभिनेता मनीष याची. उच्चविद्याविभूषित, उच्चकुलीन, श्रीमंत घरातील तरुण पण मनात इच्छा मात्र लोकसेवेत जीवन घालवण्याची. वडिल लग्न ठरवतात तेव्हा नाईलाजाने तो मुलीला पहायला जातो आणि सुंदर आणि सुशील नूतनच्या प्रेमात पडतो. सगाई होते, दोघेही आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवायला लागतात, एकमेकांना पत्र लिहून आपलं मन मोकळं करतात. पण नायकाची आजी मरताना तिची सगळी इस्टेट नायकाच्या नावे करते आणि त्याला आधीच पाण्यात पाहणाऱ्या त्याच्या सावत्र आईला हे सहन होत नाही. वडिलांना क्षोभ होऊ नये आणि घरातील सौख्य टिकावे म्हणून तो नूतनला आणि तिच्या घरी पत्र लिहून घरातील परिस्थितीमुळे लग्न करता येत नसल्याचे कळवतो. नाईलाजाने तिचे वडिल दुसऱ्या ठिकाणी तिचे लग्न ठरवतात. इकडे मित्राच्या आग्रहामुळे सरस्वती तिला भेटायला यायला निघतो - निष्कांचन असला तरी ती त्याच्याशी लग्न करु इच्छिते का हे विचारण्यासाठी, पण वादळात बोट उलटल्यामुळे तो तिच्या घरी पोहोचतो तोवर तिची डोली निघत असते. ते पाहून विषण्ण अवस्थेत नायक म्हणतो,
हम ने अपना सब कुछ खोया, प्यार तेरा पाने को
छोड़ दिया क्यों प्यार ने तेरे दर-दर भटकाने को
गीतकार इंदीवर यांनी नायकाची मनोवस्था अतिशय सुरेख पकडली आहे गीतात. गुजराथी पार्श्वभूमी असल्यामुळे कल्याणजी-आनंदजींचं संगीत या चित्रपटात अगदी खास खुललं आहे हे खरंच, की तो माझ्या मनाचा खेळ कुणास ठाऊक!
का कोणास माहीत हे गाणं एकीकडे नायकाच्या मनातील दुःख तर दाखवतेच पण शिवाय कुठेतरी त्याला कडवटपणाची झालर आहे असं वाटत राहतं. कारण दुसऱ्या कडव्यात नायक भारतीय परंपरेला अनुसरुन विवाह झाल्यावर आता पतीशी एकनिष्ठ रहा अशी इच्छा मनाशी व्यक्त करतो खरी, पण त्याच वेळी तिच्या विवाहाची वेदी ही आपल्यासाठी चिता झाल्याचं शल्यही त्याच्या मनात आहे.
उसकी रहे तू, जिसकी हो ली, तुझको मुबारक प्यार की ड़ोली
बैठ गये हम ग़म की चिता पर, ज़िंदा जल जाने को
प्यार तेरा पाने को
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा